अंधश्रद्धा निर्मूलन समितिसाठी गोडबाबा हे प्रकरण १२ वर्षापूर्वीच संपलेल आहे , आजपर्यंत वारंवार मागणी करूनही गोडबाबा ने कोणत्याही प्रकारची अधिकृत वैज्ञानिक चाचणी सिद्ध केलेली नाही, तसेच त्याने गोड केलेल्या पाण्यात प्रचंड प्रमाणात सॅकरिन आढळून आले॰ या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गोडबाबाचा हा तथाकथित चमत्कार दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी सादर करतात, यामुळेच गेल्या बारा वर्षात गोडबाबाची बुवाबाजी संपल्यातच जमा आहे॰ अशा बाबी social networking site वर पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न केविलवाण्या व पराभूत मनोवृत्तिचे लक्षण आहे॰
नरेन्द्र दाभोलकर
नरेन्द्र दाभोलकर