महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य भारतातील या स्वरूपाचे आणि एवढे व्यापक बहुदा एकमेव आहे॰ या कार्याची पंचसूत्री अशी
१ शोषण करण्यासाठी कारणीभूत अंधश्रद्धांना विरोध करणे,
२ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार अणि अंगीकार करणे,
३ धर्माची विधायक कृतीशील चिकित्सा करणे
४ दैववादाला नकार देणे,
५ व्यापक परिवर्तनाशी विचाराने आणि कृतीने स्वतःला जोडून घेणे॰
हे कार्य पूर्ण अर्थाने शैक्षणिक आहे अणि भारतीय संविधानातील नागरिकांच्या कर्तव्याशी धरून आहे॰ भारताचे शैक्षणिक धोरण शिक्षणाचे काही महत्वाचे गाभा घटक सांगते॰ त्यातील एक घटक आहे वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती॰ त्याबरोबरच संविधानात सांगितलेल्या नागरिकांच्या कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे॰
हा विचार आणि ही जाणीव कृतीशील करण्याचा मार्ग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटनेतून जातो॰ संघटनेत सहभागी झालेल्यांना एक नवा समर्थ दृष्टिकोन मिळतो, जो त्यांना जीवनात अधिक चांगला व यशस्वी माणूस बनवू शकतो॰
काम करणे शक्यच नसेल तर विचार समजून घेणे आणि अंधश्रद्धा दूर होण्यासाठी विचार पसरवत रहाने हे देखील महत्वाचे आहेच, यासाठीच आपल्याशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याद्यक्ष नरेन्द्र दाभोलकर मनःपूर्वक संवाद साधू इच्छितात॰
(कृपया आपली प्रतिक्रिया व प्रश्न कळवा)
(अधिक माहितीसाठी मेल करा kolhapuranis@gmail.com वर)
(प्रश्न नोंदवण्यासाठी व डॉ दाभोलकर यांच्या उत्तरासाठी "comments" येथे click करा)
लग्नात आपण वधु-वरांच्या डोक्यावर तांदुळ टाकत असतो. कारण आपला संस्कार आपल्याला असे सांगतो की भटजी ज्या वेळेला मंगलाष्टक म्हणत असतो, त्या वेळेला अक्षता वधु-वरांच्या डोक्यावर पडल्या तर त्यांचा संसार सुखाचा होतो. भटजीने “शुभ मंगल सावधान” म्हटले की आपण वधु-वरांवर अक्षता टाकायच्या एवढं करीत असतो.
ReplyDeleteपण मंडळी, आपण टाकलेल्या अक्षता पैकी किती अक्षता त्या वधु-वरांच्या डोक्यावर पडतात ? १०% सुध्दा नाही. जवळ जवळ ७०% अक्षता आपण आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसांच्या डोक्यावर टाकतो. २०% लोक त्या अक्षतांचा विवीध गोष्टी साठी वापर करतात, एखाद्या मित्राला किंवा विशषत: मैत्रीणीला सतविण्यासाठी, कोणा व्यक्ती विरुध्द राग व्यक्त करण्यासाठी, मुद्दामहून बायकांकडे जोरात अक्षता फेकून क्षणीक विकृत आनंद मिळविण्यासाठी...
लग्न छान पार पडतं, लग्नाच्या हॉलमधून बाहेर येताना बहुतेकजण डोक्यावर हात फिरवून आपल्या केसांमधील अक्षता काढतात. सगळी मंडळी गेल्यावर पूर्ण हॉलभर राहतो तांदळाचा सडा... तोही लोकांनी पायानी तुडविलेला... आपल्या धर्मात म्हटलं जातं “अन्न हे पुर्ण ब्रम्ह”. असे अन्न वाया घालवून व पायदळी तुडवून आपण अन्नाचा अपमान करीत नाही का ?
एका लग्नामध्ये सुमारे ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ४ लाख लग्न होतात म्हणजे सरासरी २० लाख किलो तांदुळ आपण व्यर्थ वाया घालवितो. एकीकडे जव्हार-मोखाडा येथे लहान मुलं अन्न नाही म्हणून कुपोषित होताहेत आणि आपण सहज लाखो किलो अन्नाची नासाडी करतो.
तुम्ही म्हणाल की तांदुळ नाही टाकायचे तर टाकायचे तरी काय ? १३५ वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी लग्नाला तांदळा ऐवजी फुलं वापरण्याचा विचार मांडला होता. एकतर फुलं आपण खात नाही, सगळेजण फुले वापरायला लागल्यावर २० लाख किलो फुलांच मार्केट तयार होईल, शेतकर्यानला, कष्टकर्या ला काम व पैसा मिळेल.
कोणत्याही वधु-वरांला डोक्यावर तांदळाऐवजी मऊ, मखमली फुलें पडली, त्यात त्यांना आप्तेष्टांचा आशीर्वाद व हळूवार मायेचा ओलावा जाणवेल. माझ्या मित्राला त्याच्या लग्नात अंगावर अलगद फूलांच्या पाकळ्या पडत आहेत हे फारच “रोमॅन्टीक” वाटलं.
आपल्या सारख्या प्रगल्भ व्यक्तींनी हा चांगला पायंडा पाडावा ही इच्छा. सगळ्यांनी असा विचार केल्यास वाचलेले २० लाख किलो तांदुळ अनाथाश्रमात किंवा बाबा आमटेंच्या आनंदवनात पाठविले तर त्याहुन अन्य पुण्य नोहे........
मला आपले विचार जरुर कळवा...... अनिल करवीर
आपली संकल्पना योग्य आहे, तसेच आपल्या मताशी मी सहमत आहे, अंनीस आपल्या विचारांचे स्वागत करते। अंनीस चे काम आपण समजावून घेवून कार्यात सहभागी व्हावे। अधिक माहितीसाठी kolhapuranis@gmail.com or antisuperstition.org वर संपर्क साधावा.
ReplyDeleteनरेन्द्र दाभोलकर
ब्लॉग चालू केल्या बद्दल आभार आणि शुभेच्छा. पण ब्लॉग प्रामुख्याने मराठीत असावा अस वाटतं. अनिसच्या वेबसाईटवर देखिल सतत नवा मजकुर यावा ही अपेक्षा. मी ’अनिसचं कार्य करायचंय!’ हे वार्तापत्रातील अवाहन नेहमीच वाचतो आणि (मुळच्या आळशी स्वभावानुसार ) पुढे काहीच करत नाही. पण मी जरी Web Technologies मधला तज्ञ नसलो तरीही मला Blog writing, Forums moderation चा थोडा अनुभव आहे. त्यामुळे मला Website / Blog संबंधात मदत करायला आवडेल.
ReplyDeleteHya gode babache kay prakaran aahe?
ReplyDeleteDabholkar Saheb blog saathi dhanyavad.
ReplyDeleteMi Dr. Shreeram Lagu yaanchi ek Interview baghitali hoti. Tya madhe tyani don gostincha ulekh kela hota
1. Devala retire kara aani 2. Kirvant
Tumhi mala hya to babi lekhachya swarupa pathau shakatat ka? athava hya var pustke prakashit zaali asalyas mala pustkanchi naave aani prakashak ka che naav pathvave.
Punhya ekada dhanyavad...
-Deepak S
प्रति दिपक
ReplyDeleteआपल्या पहिल्या प्रश्नासाठी पुस्तक सुचवीत आहे "मनोविकास प्रकाशनाचे 'अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचा पंचनामा' हे अब्राहम कोवूर यांचे 'प्रा सी भा दातार' यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला डॉ लागु यांची प्रस्तावना आहे तिचा कृपया सन्दर्भ घ्यावा दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण जर kolhapuranis@gmail.com वर संपर्क जर साधलात तर आपणास लागु यांच्या बरोबर बोलता येईल संपादक
narendradabholkar।blogspot।com
अनुदिनीकारांच्या जाळ्यात आपले स्वागत आहे. http://mr.upakram.org/tracker/582
ReplyDeletehttp://faljyotishachikitsa.blogspot.com/ येथे आम्ही वसतो.
thanks to start the blog
ReplyDelete